पत्रकार दिनानिमित्त आदिवासी पाड्यावर पनवेल तालुका पत्रकार विकास मंच व प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट यांच्या कडून ब्लँकेट वाटप
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
पत्रकार म्हटले की लोकशाहीचा चौथा स्तंभ व समाजाचा आरसा तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निःस्वार्थीपणे झटणारी व्यक्ती म्हणजेच पत्रकार. आज दिनांक ६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी पहीले मराठी वृत्तपत्र “दर्पण” हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते.म्हणुनच आजच्या दिवशी मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात येतो.


पत्रकार दिनानिनित्त श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या सौजन्याने व पनवेल तालुका तालुका पत्रकार विकास मंच यांच्यावतीने “मायेची ऊब” या उपक्रमांतर्गत दुंदरे येथील आदिवासी पाड्यावर ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.


यावेळी पनवेल तालुका पत्रकार मंचाचे अध्यक्ष माधव पाटील, प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर सचदेव, संजय कदम, सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक विवेक पाटील, हरेश साठे, नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, रवींद्र गायकवाड, विशाल सावंत, ओमकार महाडिक यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.











Be First to Comment