पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने खैरवाडी (फणसवाडी) येथे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फणसवाडी (खैरवाडी) येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पनवेलमधील पत्रकारांकडून एक अनोखा संदेश देण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने पत्रकार दिनी समाजाची सेवा करून एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे.

यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे जेष्ठ सल्लागार माधवराव पाटील, प्रमोद वालेकर, अध्यक्ष रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संजय कदम, सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव सुधीर पाटील, खजिनदार हरेश साठे, सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक विवेक पाटिल, विशाल सावंत, प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर सचदेव, रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.









Be First to Comment