सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई ।
पत्रकार दिनाचे औचित्य साधून एकविसाव्या शतकातील एकविसावे वर्ष: आव्हाने या विषयावर विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग यांच्या सहकार्याने नवी मुंबई प्रेस क्लब व नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बुधवार, दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादात राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक मा. डॉ. दिलीप पांढरपट्टे, दैनिक लोकसत्ताचे संपादक मा. श्री. गिरीश कुबेर, सामाजिक कार्यकर्ते तथा विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी आपले विचार मांडणार आहेत.
नवी मुंबई व परिसरातील पत्रकारांसह शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी या परिसंवादास मास्क लावून व वावरताना सुरक्षित अंतराचे भान ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








Be First to Comment