प्रति हेक्टरी ४.५० कोटी भूसंपादनाचा मोबदला तातडीने देण्याची एकनाथ देशेकर यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।
तालुक्यातील चिंध्रण,कानपोली,महाळुंगे या गावातील जमिनी प्रस्तावित अतिरिक्त तळोजा औदयोगिक क्षेत्राकरिता संपादित करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना मा.उप विभागीय अधिकारी पनवेल यांचे कडून १९ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र औदयोगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२ (१) अन्वये नोटीस हि देण्यात आली आहे सातबारा व फेरफार वर तशा नोंदी हि झाल्या आहेत मात्र अद्याप भूसंपादनाचा मोबदला मिळाला नाही, जो प्रति हेक्क्टरी साडेचार कोटी मोबदला उच्चअधिकार समितीने ठरवून दिला आहे तो त्वरित मिळावा अशा आशयाचे निवेदन भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या शिष्ठमंडळाने पनवेल प्रांत कार्यालयात निवासी नायब तहसीलदार महेंद्र बेलदार यांना दिले आहे.
प्रस्तावित अतिरिक्त तळोजा औदयोगिक क्षेत्राकरिता पनवेल तालुक्यातील मौजे चिंध्रन ,कानपोली ,महाळुंगे या गावातील खाजगी जमिनी शासनाने संपादित करण्याचे निश्चित केले आहे .त्यानुसार महाराष्ट्र औदयोगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२ (१) अन्वये नोटीस हि देण्यात आली आहेत,मा प्रधान सचिव उद्योग तथा अध्यक्ष उच्चधिकार समिती यांचे अध्यक्षतेखाली १३ जुले २०२० रोजी झालेल्या बैठकीमध्ये साडेचार कोटी प्रति हेक्टरी मोबदला देण्याचे शासनाकडून मान्य केले आहे आजमितीस हा मोबदला बाजार बाजारभावापेक्षा जरी कमी असला तरी एम. आय .डी.सी. मुळे या गावांचा विकास होऊन सुशिक्षित तरुणांना नोकरी ,कामधंदे मिळतील या सद् भावनेने जमिनी साडेचार कोटी प्रति हेक्टरी देण्यास शेतकरी तयार झाले आहेत .
सदर भूसंपादनची कलम ३२(१) ची नोटीस २० ऑक्टोबर २०२० रोजी शेतकऱ्यांना बजावली आहे .त्यामुळे सातबारा व फेरफार ला महाराष्ट औदयोगिक विकास महामंडळ समाविष्ट असा शेरा असल्याने आम्ही या जमिनी अन्य कोणालाही विक्री करू शकत नाही , अथवा बँकेकडे तारण ठेऊन कर्ज हि घेऊ शकत नाही .सादर संपादित जमिनीचा आर्थिक मोबदला प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा झाली आहे ,अनेक कुटुंबांचे विवाह सोहळे ,आर्थिक गुजराण करणे शक्य नसल्याने , उच्च शैक्षणिक कामाकरिता लागणारा पैसा हातात नसल्याने भावी पिढी शिक्षणापासून वंचित नारू शकते त्यामुळे प्रस्तावित भूसंपादनाचा मोबदला आम्हाला तातडीने मिळावा याकरिता एकनाथ देशेकर यांच्यासह शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी पनवेल , जिल्हाधिकारी रायगड ,प्रदिशीक अधिकारी महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ याना निवेदन दिले आहे .
यावेळी एकनाथ देशेकर यांच्या सह दिनेश पाडेकर ,मधुकर पाडेकर ,अरुण देशेकर ,अल्पेच कडू ,भास्कर पाटील ,आत्माराम पाटील ,राम देशेकर ,तकदीर पाडेकर, बाळाराम कडू ,ज्ञानदेव पाडेकर ,लहू पाटेकर , आदी शेतकरी उपस्थित होते.









Be First to Comment