सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुका खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे तारेघर येथील जयराम रामजी पवार यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पसा आजाराने राहत्या घरी निधन झाले.त्यांचे मुळगाव पानोसेकोंड – माणगाव होते.
ते अतिशय प्रेमळ,परोपकारी व मनमिळाऊ, सरळ साध्या स्वभावाने सर्वांनाच सुपरिचित होते. स्वाध्याय परिवाराचे अनुयायी होते त्यांनी आहात असताना देहू – आळंदी – पंढरपूर – काशी विश्वनाथ – बनारस – वैष्णवी देवी – श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिर आदी तीर्थ यात्रा भ्रमण केल्या आज त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड व रोहा डिविजन येथे तब्बल ४० वर्षे मुख्य शिपाई मदतनीस म्हणून प्रामाणिकपणे महत्त्वपूर्ण योगदान देत कर्तव्य बजावले असल्याने त्यांनी महाडसह रोहा तालुक्यातील तळागाळातील ग्रामीण भागामध्ये देखील आपुलकीचे नाते जपले होते.
त्यांच्या अंत यात्रे प्रसंगी खारी – काजुवाडी – खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील तसेच रोहा – अलिबाग तालुक्यासह महाड तालुक्यातील भोई समाजबांधव,सामाजिक,औद्योगिक,शासकीय – निमशासकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर,नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सध्या च्या कोरोना- १९ चे प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांचे पालन करीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली,सून, जावई,भाचे,नातवंडे, पतवांडे,नातेवाईक असा मोठा परिवार आहे..
त्यांचे अंतिम धार्मिकविधी मंगळवार दि.०५जानेवारी रोजी सकाळी १०:०० ते १२:०० वाजेपर्यंत रायगड भूषण हभप बाळाराम महाराज शेळके यांची प्रवचन सेवा होणार असून सर्व धार्मिक विधी राहत्या घरी तारेघर – रोहा येथे होतील असे त्यांच्या निकवर्तीयांनी कळविले आहे..








Be First to Comment