सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी ।
पत्रकार दिलीप पाटील व शिवसेनेचे पदाधिकारी रविंद्र कमळ पाटील यांच्या आई कौशल्य कमळ पाटील यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुनाडे येथील वैकंठधाम स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.
कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून कोरोनाचा राक्षस अद्याप आपल्या बोकांडीवर बसून आहे तेव्हा कार्यकर्ते हितचिंतकानी अंत्यसंस्कारासाठी गर्दी करू नये असे आवाहन दिलीप पाटील यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले होते. कोरोनाच्या महामारीत कोणाही घरी न येता आपल्या घरीच राहून सरक्षित करा असे आवाहन त्यांनी सोशल मिडीयावरून केले आहे. त्यांना तीन मुले, दोन मुली सूना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे
“आपल्या आपुलकीने आणि प्रेमाने संपुर्ण जीवनात त्यांनी लोकांची सेवा केली. त्याच्या संस्कारामुळेच आम्ही आज घडलो. त्यातूनच मला लोकांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. जीवनाच्या यशस्वी वाटचाळीत त्यांचा मोठा वाटा आहे . ईश्वर त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, अशी दिलीप पाटील यांनी ईश्वरा जवळ प्रार्थना केली सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना डोकं वर काढत आहे. राष्ट्रीय आपत्तीजनक परिस्थितीमध्ये अनेकांनी आम्हाला भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून आमच्या पाटील कुटुंबांचे सांत्वन केले तर काही जवळच्या नातेवाईकांनी,हितचिंतकांनी, राजकीय,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, मित्रमंडळी, यांनी व्यक्तिशः भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.परंतु आम्ही पाटील कुटुंबीय यांचेतफेॅ आतापर्यंत अनेकांनी आम्हाला संपर्क केलेला आहे त्यांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत.








Be First to Comment