पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती खांदेश्वर पोलीस ठाणे व राजे प्रतिष्ठानतर्फे “द दारूचा नव्हे द दुधाचा” या संकल्पनेतून नागरिकांना मसाला दूध वाटप
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई विविध हॉटेल, पब्स, बार किंवा इतर नामांकित ठिकाणी जल्लोष करण्यासाठी तयार असते. ३१ डिसेंबर असला कि सगळीकडे पार्ट्या आयोजित केलेल्या असतात. हॉटेलमध्ये तुडुंब गर्दी असते. या दिवशी तरुणाई मध्यरात्री आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडत असतात तर काहीजण १२ वाजेपर्यंत मद्यपान करण्यात व्यस्त असतात यामुळे नंतर असुरी शक्ती अंगात येऊन भरधाव वेगाने वाहने चालवणे, धिंगाणा मस्ती करणे अशा प्रकारचे प्रकार होऊन तरुण रस्ते अपघातात आपला जीव गमाववतात तर काही जण पुढचे काही महिने तुरुंगात काढतात यासर्वात त्रास फक्त घरच्या लोकांना होती याची जाणीव ठेवूनच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती खांदेश्वर पोलीस ठाणे व राजे प्रतिष्ठानतर्फे खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० ते १०.३० या वेळेत नागरिकांसाठी मसाला दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई पोलिसांनी राबविलेल्या नशामुक्ती अभियानात आता पत्रकारांनीही सोबत दिली असून यावेळी नागरिकांना “द दारूचा नव्हे तर द दुधाचा” हि संकल्पना राबवून व्यसनाधीनतेने होणारे नुकसान याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमास परिमंडळ – 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे, नगरसेविका सिताताई पाटील, साई संस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, माजी सरपंच शशिकांत शेळके, शिवसेना उपमहानगर प्रमुख लिलाधर भोईर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम, सल्लागार निलेश सोनावणे, उपाध्यक्ष केवल महाडिक, सचिव रवींद्र गायकवाड, सहखजिनदार अनिल कुरघोडे, विवेक पाटील, मंदार दोंदे, राजेश डांगळे, ओमकार महाडिक, राजे प्रतिष्ठानचे नवीन पनवेल शहराध्यक्ष संतोष आमले, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छीन्द्र पाटील, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, कैलास रक्ताटे, अमित पंडित, साक्षी सागवेकर यांच्यासह पोलीस अधिकरी व कर्मचारी तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

समितीतर्फे यावेळी 1000 नागरिकांना दूध वाटप करण्यात आले तसेच कोरोना अद्यापही गेला नसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने 1000 नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.









Be First to Comment