सिटी बेल लाइव्ह । वाकण । महेश पवार ।
कासू (ता.पेण) येथील सामाजिक कार्यकर्ते व श्री गणेशनाथ महाराज वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. हिराजी विठोबा तांडेल (वय ७६) यांचे बुधवार दि. ३० डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
दिवंगत ह.भ.प. हिराजी तांडेल हे कासू गावातील श्री लक्ष्मी नारायण भजन मंडळाचेही अध्यक्ष होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी सांप्रदाय व सामाजिक कार्यासाठी वाहून दिले होते. त्यांच्या निधनाने कासू, पांडापूर, खारपाले गांवांसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. ह.भ.प. हिराजी तांडेल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, चार मुली, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.








Be First to Comment