सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील खानावळे गावातील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांची भेट घेवून आशिर्वाद घेतले आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत 9 सदस्यांपैकी शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.

यावेळी शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार मोहन लबडे, रविना पाटील, प्रतिभा सोनावणे, जयश्री नाईक व गणेश कातकरी शिवसेना पदाधिकारी देवीदास पाटील आदींनी आज शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांची भेट घेवून आशिर्वाद घेतले आहेत. यांच्या विजयामुळे शिवसेनेला शुभशकुन झाला असून शिवसेनेची पनवेल तालुक्यात जोरदार घोडदौड सुरू झाल्याचे प्रतिपादन जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी केले आहे.








Be First to Comment