Press "Enter" to skip to content

बेकायदा बांधकामाचा घाट सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाडला हाणून

कळंबोली भाजी मार्केट मध्ये बेकायदा बांधकाम : सभागृह नेते परेश ठाकूर आक्रमक

सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी ।

कळंबोली सेक्टर 5 येथील भाजी मार्केट मध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला असून गोरगरीब भाजीवाल्याची पिळवणूक करून त्यांच्याकडून दहा हजार रुपये वसूल करून बेकायदा बांधकाम करण्याचा घाट सभागृहनेते परेश ठाकूर यांनी हाणून पाडला आहे.

कळंबोली भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांच्या समवेत या अनधिकृत बांधकामाबाबत निषेध व्यक्त करत सिडकोला जाब विचारण्याच्या हालचाली करण्यात आल्या. कळंबोली शहरात असलेल्या सेक्टर पाच याठिकाणी सिडकोच्या भूखंडावर गेल्या काही वर्षांपासून भाजी विक्रेते व्यवसाय करत आहेत याठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे काही पदाधिकारी यांच्यामार्फत येथील भाजी मार्केट चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे मात्र सध्या या ठिकाणी असलेल्या 100 भाजी व्यवसायिक यांच्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपये बळजबरी आकारून त्यांना पक्क्या स्वरूपाचे कठडे बांधून देण्याचा घाट घालण्यात आला होता.

याबाबत भारतीय जनता पार्टीने गंभीर दखल घेत येथील गोरगरीब भाजी विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील सुरू असलेले अनधिकृत बांधकाम कट्टे तात्काळ तोडण्याची मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले तसेच वारंवार याबाबत कळंबोलीतील वॉर्ड ऑफिसर प्रकाश गायकवाड यांच्याकडे तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने कळंबोलीतील वॉर्ड ऑफिसर प्रकाश गायकवाड यांचे निलंबन करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील परेश ठाकूर यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे या भाजी मार्केटमध्ये एका नगरसेविकेचा पती यांच्याकडून बळजबरी होत असलेली वसूल थांबून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

या आंदोलनात उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरीश केणी, बबन मुकादम, एकनाथ गायकवाड, विकास घरत, विद्या गायकवाड, राजेश्री वावेकर, अजय बहिरा, निलेश बाविस्कर, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, रमेश नायर, तसेच इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याशी महानगरपालिकेच्या दालनात बैठक झाली. आणि या आंदोलनामुळे महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.