Press "Enter" to skip to content

आमदार बाळाराम पाटील यांचा वाढदिवस साजरा

पञकार निलेश सोनावणे, समाजसेवक ऍड. मनोहर सचदेव यांना कोरोना देवदूत सन्मान पुरस्कार

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

पनवेल युवा चे संपादक तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष निलेश सोनावणे व पनवेल परिसरात कोरोना काळामध्ये गोर – गरीब जनतेची मनापासून सेवा करणारे ऍड. मनोहर सचदेव यांना कोविड काळात जीवाची पर्वा न करता सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य केले म्हणून मा.आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नावडे यांच्या वतीने आमदार बाळाराम पाटील यांच्या 57 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मानीत करण्यात आले.

पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे यांनी कोविड काळात मार्च पासून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, जागृती फाऊंडेशन, लोकशक्ती संजीवनी प्रतिषठान महाराष्ट्र या संस्थान च्या माध्यमातून अहोरात्र काम केले आहे.

ऍड. मनोहर सचदेव यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य गरीब गरजूंना जीवनाश्यक वस्तू, अन्न धान्य तसेच मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप केले आहे.

या दोघांना आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते, पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे ,शेकाप तालुका चिटणीस नारायणशेठ घरत,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस चे कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले.

आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य केलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या डाॅ. नागनाथ येम्पले,या वेळी कोविड दूत म्हणून डॉ एमपल्ले.डॉ सुरेश पाटील.डॉ. रत्ना पाटील,डॉ तन्मय कोठेकर, डॉ राहुल भोईर,डॉ किरण पाटील,डॉ मनोज शेट्ये,डॉ मनोज पाटील,ऍड मनोहर सचदेव, डॉ असिफ खान,डॉ आरिफ पटेल,डॉ अमोल राजे,डॉ साजिद खान,दिनेश शेठीया,डॉ जावेद खान,डॉ राहुल दांडेकर,डॉ दत्तात्रय जगदाळे,डॉ नितीन येवले,बबन विश्वकर्मा,डॉ संजय घरात,डॉ रुपेश गायकवाड,डॉ राहुल लाड,विमल बिडवे, या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरदास गोवारी, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, नगरसेविका प्रजोती म्हात्रे, प्रमोद भगत, सखाराम पाटील, प्रकाश म्हात्रे, आदिंसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.