सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
मोहोपाडा येथील कै.काशिनाथ मरु म्हात्रे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 84 वर्षांचे होते.त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहिला.त्यांच्यावर मोहोपाडा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै.काशिनाथ म्हात्रे हे शांत स्वभावाचे होते.परीसरात त्यांना सर्वजण बापू या नावाने ओळखत.त्यांचा शांत स्वभाव,बोलण्यात आपलेपणा असल्याने बापू सर्वांना हवेहवेसे वाटायचे.त्यांच्या पश्च्यात पत्नी,मुलगा, नातवंडे,पातवंडे असा परीवार आहे.त्यांचे उत्तरकार्यं सोमवार दिनांक 28 डिसेंबर रोजी मोहोपाडा येथील राहत्या घरी होणार आहे.








Be First to Comment