लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या झंझावात 2019-20 च्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष केवल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या ” झंझावात २०१९ – २०२० ” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन लोकनेते व पनवेलकरांचा अभिमान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते आज (गुरुवार दिनांक २४ डिसेंबर) लोकनेते रामशेठ ठाकूर निवासस्थानी करण्यात आले. तसेच यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केवल महाडिक यांना शुभाशीर्वाद दिले.

यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम, जेष्ठ सल्लागार दिपक महाडिक, सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक विवेक पाटील, सोनावणे, प्रवीण मोहोकर, संजय नोगजा, रमण खुटले, साम्राज्य न्यूजच्या साक्षी सागवेकर, डॉ. सोनाली कालगुडे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छीन्द्र पाटील, कोळखा पेठ अध्यक्ष आनंद सुरते, कैलास रक्ताटे, अमित पंडित, अनुराग वाकचौरे, ओमकार महाडिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपास्थित होते.








Be First to Comment