साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या पुढाकाराने सुटणार समस्या
सिटी बेल लाइव्ह । उलवे ।
उलवे मधील विविध समस्यांबाबत श्री साई देवस्थान, साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उलवेतील विविध संस्था, सामाजिक मंडळ यांचे शिष्टमंडळ उलवे सिडकोचे अधीक्षक अभियंता मा. पुजारी, कार्यकारी अभियंता बोकडे, रामोड , ठक्कर, पाणी पुरवठा अभियंता दलाल, नलावडे, विद्युत अधिकारी गायधनकर, आरोग्य अधिकारी बाविस्कर अश्या विविध अधिकारी वर्गासोबत पाणी, लाईट, रस्ते, स्मशानभूमी, दफनभूमी, आरोग्य विषयक, स्वच्छता, विविध धार्मिक स्थळे अश्या विविध समस्यांवर चर्चा झाली.
याबाबत पुढील महिनाभरात कामांची पूर्तता करणार असल्याने उलवेतील सामाजिक संस्था व मंडळांनी त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी से.१७ रहिवासी संघ, आम्ही उलवेकर मित्र मंडळ, बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था,उलवे तसेच सोसायटी व संस्थांचे सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment