सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लि. कंपनीतील सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व नागोठण्याजवळील वेलशेत गावातील रहिवासी मारुती धर्मा पारंगे यांच्या मातोश्री कै. जानकी धर्मा पारंगे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
कै. जानकी पारंगे ह्या शेतकरी कुटुंबातील होत्या. त्यांनी आपल्या यजमानांना शेती कामात मदत केली. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. कै. जानकी पारंगे यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे उत्तरकार्य बुधवार दि. २३ डिसेंबर रोजी त्यांच्या वेलशेत येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती पारंगे कुटुंबियांनी दिली आहे.








Be First to Comment