बेलापूर गावाला लागली आहे अनधिकृत झोपडंपट्यांची चटक !!
सिटी बेल लाइव्ह । बेलापूर ।
गेल्या दशकभरात बेलापूर गावाला झोपड्यांचा विळखा वाढत चालला आहे, झोपड्यां मुळे आजू बाजूच्या वस्त्यांना त्रास होत आहे त्याचबरोबर व्यसनाधीन लोकांचा अड्डा बनल्यामुळे समाज जीवन विस्कळीत होत चालले आहे.
त्याचबरोबर अशा झोपड्याना नवी मुंबई महानगर पालिकेने घर क्रमांक देऊन हि घरे अधिकृत केली आहेत आणि घरपट्टी वसूल करीत आहेत , तसेच विद्युत चोरीहि होत आहे. ह्या झोपड्यांचा आधार घेऊन विविध प्रकारचे अवैध धंदे चालले आहेत. ह्यातून विविध गुन्हे आणि अनुचित घटना घडत आहेत आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात अनुचित घटना घडू शकतात.
कित्येकदा शासन दरबारी विनवण्या करूनही हे प्रश्न सुटत नसून ह्या कडे दुर्लक्ष्य केले जात आहे. ह्यात कोणाचे हितसंबध गुंतले आहेत कि काय ? हे तपासण्याची गरज आहे.
सदर झोपड्यांमध्ये परप्रांतीयांची चंगळ झाली असून ; ते गोवंडी, चेंबूर, मानखुर्द अशा भागातील आहेत. त्याचबरोबर ते झोपडी माफिया असून त्यांचा हाच धंदा असल्याचे निदर्शनास आले आहे.
येणाऱ्या काळात हि वाढती लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात गुन्ह्याचे क्षेत्र बनू शकेल. गेल्या काही वर्षात मुंबई, ठाणे ह्या ठिकाणी झोपड्यांचे साम्रज्य वाढले आहे आणि त्याचा विकास कामात अडथळा निर्माण झाला आहे आणि गुन्हेगार क्षेत्र म्हणून घोषित हि झाले आहे. ह्याची पुनरावृती होईल कि काय ? अशी भीती वाटू लागली आहे.
शासनाने ह्याकडे तत्परतेनं लक्ष्य देऊन हा प्रश्न सोडवावा हि विनंती आहे आणि असे प्रकार पुन्हा घडू नये त्यासाठी, हे क्षेत्र सार्वजनिक उद्याने, पक्षी अभय अरण्य आणि रोजगार प्रशिक्षण केंद्रात रूपांतरित करावे हि ह्या माध्यमातून विनंती आहे.
जर शासन ह्या मध्ये लक्ष्य घालत नसेल तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्री विज्ञान म्हात्रे यांनी दिला आहे.








Be First to Comment