सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे सुप्रसिध्द लाडके गायक जगदिश पाटील यांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 यास भेट दिली. डॉ. विनायक देशमुख, डॉ. हर्षला दिघे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रितू पाटील, उमेश तोडेकर, प्राची जमदाडे, वृषाली आगरावकर, रोशनी तेंडूलकर, आरती माळी, सविता गायकवाड, जयश्री साबळे, मानसी भगत, निलम जाधव, दिपिका पाडवी, सुषमा साळुंके, भावेश पंडीत, प्रितेश कांबळे, अक्षय भोसले, प्रकाश सादिगळे, जयेश गोस्वामी, शिवानी बागल आदी उपस्थित होते.
यावेळी जगदिश पाटील यांनी त्यांचे सुप्रसिध्द गीत तुला खांद्यावर नेईन, तुला पालखीत मिरवीन हे साईबाबांचे गीत गावून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी त्यांच्या समवेत गायक, सुनील भोईर, आगरी समाजाचे नेते जयेंद्र खुणे, शैलेश माळी उपस्थित होते.








Be First to Comment