सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरणमध्ये अनेक होतकरू तरुणांना व्यावसायिक शिक्षण घेण्याची आवड असते परंतु त्यांना आर्थिक चणचण भासत असल्याने शक्य होत नाही. अशा तरुणांना व्यावसायिक शिक्षण घेणे सहज शक्य व्हावे यासाठी उरणमधील जुगणु कोळी यांनी लिवी ओव्हरसिज स्टडी नावाने व्यावसायिक शिक्षण देणे सुरू केले आहे. त्याचा उदघाटन सोहळा त्यांच्या मातोश्री सौ. बेबीताई कोळी यांच्या हस्ते सपन्न झाला.
यामुळे उरणच्या तरुणांचे व्यावसायिक शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.
उरणात प्रथमच लिवी ओव्हरसीज स्टडी(I) प्राव्हे.लीच्या वतीने सुरु झालेल्या आणि कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळा बरोबर संलग्न असणाऱ्या केंद्र शासन मान्यता प्राप्त “लिवी इंस्टीटयूट ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट”चा उद्घाटन सोहळा आज रिलायन्स बिल्डिंगमध्ये याचे सर्वेसर्वा व्यवस्थापकीय संचालक जुगनू कोळी यांच्या मातोश्री सौ.बेबीबाई चिंतामण कोळी यांच्या हस्ते व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या सोहळयासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे संचालक धनंजय घुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार महेश बालदी, संचालक धनंजय घुले आणि अन्य मान्यवरांनी आपले मनोगत मांडले मनोगतातून उरण सारख्या औद्योगिक परिसरात सातासमुद्रा पलीकडील शिक्षणाची आज उरण तालुक्यांतील युवकांना गरज असल्याचे सांगून जुगनू कोळी यांनी सुरु केलेला उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे नमूद केले.
या प्रसंगी इंस्टीटयूटचे व्यवस्थापकीय संचालक जुगनू कोळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “मी उरण सारख्या लहान शहरात राहतो ज्या उरणचे नाव विविध प्रकल्पामुळे जगाच्या नकाशावर पोहचले आहे. परदेशात शिक्षण घेताना मला अनेक अडचणीना सामोरे जावे लागले आहे. माझे शिक्षण युरोपात झाले, मी सहन केलेल्या अडचणी माझ्या तालुक्यांतील कोणत्याही व्यक्तीला परदेशात शिक्षण घेताना येऊ नयेत यासाठीच ही संस्था उरणमध्ये सुरू केली आहे.
या ठिकाणी वेगवेगळे कौशल्य प्रशिक्षिण देण्यात येत असून यामध्ये प्रशिक्षणार्थीला स्वअनुभवा करिता परदेशात पाठविले जाते. एकंदरीत शिका…कमवा…स्वबळावर उभे रहा हा आमचा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी राज्यांतील विविध जिल्ह्यातील २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.आणि २०२० साठी प्रवेश खुले आहेत. उच्च शिक्षित अनुभवी शिक्षक वर्ग, भरपूर प्रॅक्टिकल आणि माफक फी ही आमच्या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत असे जुगणु कोळी यांनी शेवटी सांगितले.








Be First to Comment