26 डिसेंबरला परिवर्तन सामाजिक संस्था ताळा तोडो आंदोलन छेडणार
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
खांदा वसाहत परिसरातील मैदाने सिडकोने रहिवाशांसाठी खुले न केल्यास येत्या 26 डिसेंबरला परिवर्तन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताळा तोडो आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे.
खांदा कॉलनी मध्ये महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या सेकटर -8 (मैदान भूखंड क्र 02)आणि सेकटर- 7(मैदान भूखंड क्र बी-2) अश्या दोन शाळा आहेत दोन्ही शाळांना सिडकोने दिलेले मैदान शालेय वेळेनंतर तसेच सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी परिसरातील जनतेसाठी कायद्यानुसार खुले ठेवणे आवश्यक आहे तरी सदर दोन्ही शाळाकडून शाळेची मैदाने कुलूप लावून बंदिस्त केलेले आहेत तसेच खाजगी स्कूल बसेस बेकायदेशीररित्या मैदानावर उभे केलेल्या आहेत त्यामुळे सिडको महामंडळाने दिलेल्या मैदाना चे महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी अटी शर्तीचा भंग केलेला आहे.
खांदा कॉलनीतील मुलांना कुठेही खेळण्यास मैदान नाही अशी व्यथा सचिन नाईक व सचिन धोत्रे यांनी परिवर्तन सामाजिक संस्थे कडे मांडली होती. खांदा कॉलनीत सहा शाळा आहेत सर्व शाळांना सिडकोने दिलेली मैदाने बंदीस्त करून ठेवली आहेत. सिडकोचे हे नियम सर्व शाळांना लागू आहेत. तरी सदर शाळांचे मैदान कायद्यानुसार मैदान 25 डिसेंबर पर्यंत खांदा कॉलनीतील रहिवाशी मुलांना व विविध स्थानिक क्रीडा संस्थांना खुले करुन दिले नाही तर 26 डिसेंबर 2020 रोजी परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे ’ताळा तोडो’ आंदोलन करून खांदा कॉलनीतील जनतेसाठी खुले करून देण्यात येईल आणि होणार्या सर्व परिणामास शाळा व्यवस्थापन जबाबदार असेल असे परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सांगितले.








Be First to Comment