सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील कोंडगाव येथील दगडु रामजी मालुसरे (वय७४) यांचे सोमवार दि. १४ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोंडगाव येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, समाजबांधव व परिसरातील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.
कै. दगडु मालुसरे यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य हे शेती करण्यात घालवले. कोंडगाव गावांमध्ये त्यांची सर्वांशीच एक चांगली जवळीक निर्माण होती. स्वभावाने प्रेमळ असलेले मालुसरे येवढ्या वयातही शेतात काम करण्याची चिकाटी त्यांच्या अंगात होती. पंरतु काही दिवसांच्या अल्पशा आजाराने त्यांची तब्येत खालावली. अखेर त्यांची सोमवार दि. १४ डिसेंबर रोजी प्राणज्योत मावळली. कै. दगडु मालुसरे यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि. २३ डिसेंबर व उत्तरकार्य शनिवार दि. २६ डिसेंबर रोजी कोंडगाव येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे मालुसरे कुंटुबियांकडुन सांगण्यात आले आहे.







Be First to Comment