सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
तालुक्यातील दिघोडे गावाजवळून गेलेल्या हेटवणे धरणाची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. पाईप लाईन कशामुळे फुटली याचे कारण समजले नाही.
उरण परिसरात हेटवणे धरणाचा पाणी पुरवठा केला जात आहे. दिघोडे गावाजवळून पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे. ही पाईपलाईन दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फुटून मोठ्या प्रेशरने पाणी उडू लागले. जवळ जवळ १० ते १५ फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. या जोरदार पाण्याच्या फवाऱ्याने शेजारील घरांचे पत्रे उडाली आहेत. मात्र ही घटना दिवसा घडल्याने इतर दुर्घटना घडली नाही.

पाईपलाईन फुटल्यानंतर काही वेळातच ती बंद करण्यात यश आले खरे पण या अवधीमध्ये हजारो लीटर पाणी वाया गेल्याचे समजते.








Be First to Comment