सात विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खा.सुनिल तटकरे यांनी तालुक्यातील भाजपाला दणका देत देवद ग्रामपंचायतीमधीलसात विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे नेते खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन तालुक्यातील देवद ग्रामपंचायतीमधील मा. सरपंच व विद्यमान सदस्या करूणा वाघमारे, अश्विनी ठोकळ, दिपाली पाटील, ललिता गायकर, सुनंदा रणखंबे, निलेश जुवेकर, संतोष वाघमारे या विद्यमान सदस्यांनी तसेच भाजपा गाव अध्यक्ष जगदीश वाघमारे, हरिश्चंद्र वाघमारे, वासुदेव वाघमारे, मा. सदस्य संजय वाघमारे, गणेश गायकर, संजय पाटील, सुदाम वाघमारे, प्रमोद रणखंबे, जनार्दन गायकर आदींसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला.

यावेळी त्यांच्या प्रवेशासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पनवेल विधानसभा अध्यक्ष दर्शन ठाकूर व महाराष्ट्र प्रदेश सेवादल उपाध्यक्ष प्रसाद पेिंगळे यांनी विशेष प्रयत्न केले होते. आगामी काळातसुद्धा पनवेल तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहिर प्रवेश करणार असल्याची माहिती पनवेल विधानसभा अध्यक्ष दर्शन ठाकूर यांनी दिली.








Be First to Comment