माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घेण्यात आल्या चाचण्या
नवी मुंबई,दि.11
कोरोना विषाणू (कोविड-19) संक्रमण व प्रादुर्भाव या अनुषंगाने कोकण भवन इमारतीत विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने इमारतीतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी मोफत कोरोना विषयक (RT-PCR व Antigen) चाचणी करण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. कोकण भवन येथील महिला भोजन कक्ष, दुसरा मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (विकास) श्री.गिरीष भालेराव, उपायुक्त (करमणूक) श्रीम. सोनाली मुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, नायब तहसिलदार श्रीम. माधवी डोंगरे उपस्थित होत्या.
दिवसभरात एकूण 138 एवढया चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 138 चाचण्या निगेटिव्ह आल्या व एकही पॉझिटिव्ह चाचणी मिळाली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पथक डॉ.तन्मय (BAMS) , डॉ.रत्नराज (BAMD/MD) यांनी यासाठी विशेष श्रम घेतले. या शिबीरासाठी उपस्थित महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या होत्या. या शिबीराच्यावेळी सोशल डिस्टनसिंगसह मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करण्यात आला.







Be First to Comment