सिटी बेल । मुंबई । विठ्ठल ममताबादे ।
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा वार्षिक मेळावा व संघटना बांधणीचा कार्यक्रम दादर, मुंबई येथे मनोहर साळवी, अधिवक्ता राजेंद्र पारकर, अधिवक्ता प्रभाकर पारसे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
रायगड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात धडाडीने काम करणारे तरुण अक्षय भोसले यांची मराठी विषयाची चळवळ करणाऱ्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. यावेळी सुहास साळुंखे यांची रायगड उपजिल्हा अध्यक्ष, प्रतीक जगताप यांची महाड तालुका अध्यक्ष, वैभव सोनवणे महाड शहर अध्यक्ष, तेजस भोसले, शुभम कळमकर, करण साळुंखे यांचे जिल्ह्यातील विविध विभागाचे अध्यक्ष म्हणून तर विजय तेलंगे माणगाव तालुका समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली. तर उरण शहरातील तरुण समाजसेवक अमोल दुरुगकर यांची उरण शहर संपर्क प्रमुख म्हणून निवड झाली.
उपस्थित अधिवक्ता राजेंद्र पारकर यांनी मराठी भाषा व मराठी लोकांच्या हक्कासाठी तसेच महाराष्ट्र हित लक्षात ठेवून काम करण्याची वेळ आली आहे सांगितले तर मनोहर साळवी यांनी संघटनेच्या कार्याचा उल्लेख करत सर्वांनी मिळून कायदेशीर मार्गाने मराठीसाठी काम केले पाहिजे सांगितले. अधिवक्ता पारसे यांनी संघटनेला कायदेशीर अडचण आली तर मी नक्कीच मदत करेन असे सांगितले. उपस्थित पत्रकार श्री. मयेकर यांनी पालिका व सरकारच्या विविध योजनांची कंत्राटे मराठी लोकांनी मिळविली पाहिजेत. तसेच महाड मध्ये उभे राहत असलेल्या भव्य जैन मंदिराकडे लक्ष वेधले. जिल्हाध्यक्ष अक्षय भोसले यांनी रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र संरक्षणाचे काम करून संघटनेची उभारणी करणार असल्याचे सांगितले.
तद्नंतर नाईक, ननावरे, देसाई यांनीही महाराष्ट्र संरक्षणा बद्दल संबोधित केले.
मंदार नार्वेकर व अमोल रणदिवे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. कार्यक्रमास स्वप्नील नाईक, निकेत दळवी, शांतीलाल ननावरे, नितीन देसाई यांच्यासह संघटनेचे विभागीय संपर्क प्रमुख व सचिव असलेले महेश धुरी, दिलीप घाग, श्रीकांत अदाते, कमलेश पोखरे, चेतन कोलगे यांसह पदाधिकारी प्रमोद मसुरकर, अमर कदम, रवींद्र कुवेसकर, प्रणिल पडवळ, रोहित कोळी, तुषार देशमुख, दिवाकर मठकर, संदेश जाधव, अभिजित मोरे, विघ्नेश जुवळे, महादेव नारायणकर, सुयोग पवार, प्रकाश शिंदे, समीर मोरे इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.












Be First to Comment