सिटी बेल लाइव्ह । मुंबई । मुकुंद रांजाणे ।
मुंबई मंडळाचे मुख्य तिकीट निरीक्षक रामप्रकाश आर. चौधरी हे काही वर्षांपासून नेरळ- माथेरान मिनी ट्रेन साठी सेवा करीत असून त्यांना सन २०१९-२०२० या वर्षामध्ये रेल्वे विभागाकडून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडत आपल्या काम अत्यंत चोखपणे बजावले होते. त्यामुळे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून रेल्वे विभागाकडून पी.सी.सी.एम. प्रशस्ती पत्रक आणि दोन हजार रुपये अशा प्रकारचा पुरस्कार वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक मुंबई यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे नेरळ माथेरान या सेक्शनमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक रामप्रकाश चौधरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. चौधरी यांचे इथल्या स्थानिक नागरिकांशी सुध्दा नेहमीच जिव्हाळ्याचे अन आपुलकीचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. नेहमीच हसतमुखाने आणि प्रेमाने रहात असल्याने त्यांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासले आहेत. त्यांना रेल्वे विभागाकडून प्राप्त झालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर कौतुकाचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









Be First to Comment