मुंबई विद्यापीठातील अस्थायी महिला कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय
सिटी बेल लाइव्ह । मुंबई ।
शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या पुढाकाराने मुंबई विद्यापीठातील अस्थायी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षेतेखाली सखोल चर्चा होऊन अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या मार्गी लावण्याचे काम झाले असून ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या महिला दिनानिमित्त मुंबई विद्यापीठात काम करणाऱ्या अस्थायी महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे.
महिला कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन तसेच पाळणाघर, रेस्ट रूम, भविष्य निर्वाह निधी, मेडिकल लिव्ह, ओळखपत्र मिळण्याबाबत समस्या मांडण्यात आल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य श्रीमती सुप्रिया कारंडे यांनी या सर्व महिलांचे नेतृत्व करत या विषयाला वाचा फोडण्याचं काम वेळोवेळी केले आहे. जगातल्या नामंवत विद्यापीठात गौरवल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठात ५०० हुन अधिक महिला अस्थायी महिला कर्माचारी काम करीत आहेत. मा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन देण्याबाबत, प्रसूती रजेवर गेलेल्या अस्थायी महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा भविष्य निर्वाह निधी देण्याबाबत, पाळणाघर व कॉमन रूम देण्याबाबत तसेच २००९ ते २०१६ या कालावधीत त्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे, योग्य ओळखपत्र देणे, नियमित वेतन पावती देणे, अस्थायी महिलांना वैद्यकीय तसेच नैमित्तिक रजा देणे व आरोग्य विमा देणे अशा अनेक मागण्या प्रलंबित होत्या या सर्व मागण्यांचे निवेदन घेऊन शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांच्या पुढाकाराने व सिनेट सदस्या सुप्रिया कारंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अस्थायी महिला कर्मचाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. उदयजी सामंत यांची काल भेट घेतली असता त्यांनी तातडीने मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू रजिस्टार यांना तातडीने बोलावून या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. उदयजी सामंत यांच्या सहकार्याने व शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांच्या पुढाकाराने प्रलंबित मागण्या मार्गी लागल्याने या महिलांनी आमदार डॉ. मनीषा कायंदे व सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे यांचे आभार व्यक्त केले








Be First to Comment