मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली अमित ठाकरे यांची भेट
सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे शहर यांच्यावतीने दि.18/11/2020 रोजी पुकारलेल्या आंदोलनामुळे MMRDA कडुन मच्छिमारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु MMRDA कडून दिलेली वेळ उलटुन गेल्यानंतरही मच्छीमारांचे प्रश्न जैसे थे अशा परिस्थितीत आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील MMRDA कडुन या विषयावर समाधान कारवाई करण्यात टाळाटाळ करण्यात येत होती.त्यामुळे मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या नेतृत्वाखाली ऍड. अक्षय काशीद यांच्यासमवेत मनसे उलवे शहर पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांना मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी पनवेल ता.उपाध्यक्ष निर्दोष गोंधळी, उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष श्रीमत घरत, सरचिटणीस अनिकेत ठाकुर, सचिव मनोज कोळी, गव्हाण विभाग अध्यक्ष तुषार म्हात्रे, उपाध्यक्ष कु.प्रितम तांडेल, वाहतूक सेना अध्यक्ष कु.अमित पाटील, न्हावा शाखा पदाधिकारी विक्रांत भोईर, बाळकृष्ण घरत, गणेश पाटील, वहाळ शाखा पदाधिकारी वृणाल म्हात्रे आणि नितीन गाताडे, मोरावे शाखा पदाधिकारी मनोज म्हात्रे उपस्थित होते.








Be First to Comment