सिटी बेल लाइव्ह । मुंबई । विठ्ठल ममताबादे ।
मुंबई मधील अंधेरी येथे पार पडलेल्या फिलमोरा प्रस्तुत हॉटेल श्रीजी आडोटोरियम मध्ये फिल्म इंडस्ट्री मधील मानाचा समजल्या जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे गावचे गोपाळ दिनकर म्हात्रे यांना 2021चा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी फिल्म इंडस्ट्री मधील अनेक हस्ती उपस्थित होत्या यामध्ये धडक कामगार नेते अभिजित राणे ,पूर्व मंत्री अमरजित मिश्रा,एक्ट्स कीर्ती वर्मा,सुनील पाल,सासुरल सिमरका मधील स्वेता सिन्हा,आनंदश्री डॉ दिनेश गुप्ता ,अखिलेश सिंग यादव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.आजपर्यंत गोपाळ म्हात्रे यांना अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. क्रीडा व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा महत्वाचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याने गोपाळ म्हात्रे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment