Press "Enter" to skip to content

लॉक डाऊन चा असाही सदुपयोग : पहा हा व्हिडिओ

निसर्गप्रेमींनी केली ऑक्सिजन पार्क ची निर्मिती

सारडे येथील कोमनादेवी परिसरात सारडे विकास मंच तर्फे अनोखा उपक्रम

सिटी बेल लाइव्ह / निवास गावंड / उरण #

वाढदिवसाच्या भपकेबाज जल्लोषाला तिलांजली देत तो सामाजिक उपक्रमातून साजरा केल्याने एक अलौकिक समाधान मिळते. समाजाचे ऋण फेडता येते. जन्म दिनाच्या दिवशी अतुलनीय सामाजिक कार्यातून समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न सारडे येथे करण्यात आला.सारडे येथील कोमनादेवी परिसरात सारडे विकास मंच तर्फे अध्यक्ष नागेन्द्र म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन छोटे ऑक्सीजन पार्क तयार केले आहे.

अपल्या संस्कृति मध्ये तुळस या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे पुराणात सुद्धा तुळशीचे आयुर्वेदिक उपयोग खूप खूप आहेत असे नमूद आहे. तिच्यामुळे परिसर हा पावन होत असतो म्हणजे या वनस्पतीच्या अंगी सत्वगुण आहे. तुळशीचे तत्व वातावरण ज्या नकारात्मक लहरी असतात त्या घालवून देण्याचे काम करत असतात.
जगभरात पसरलेल्या covid विषाणू मुळे नागरिकांना ओकसिजन चे महत्व आणखीन प्रकर्षाने समजले असावे.

नागेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सारडे विकास मंच चे नेहेमीच निसर्ग संवर्धनात महत्वाचे योगदान राहिले आहे. ऑकसिजन पार्क ही अनन्यसाधारण कल्पना असून यापूर्वी ती कुणीही मूर्त स्वरूपात आणली नसेल.या संकल्पनेला वास्तवात उतरवण्यासाठी संपेश पाटील ,रोशन पाटील, रोहित पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले तर ऑक्सीजन पार्क निर्मिती मध्ये समाधान पाटील,रोहित पाटील,रोशन पाटील, प्रतिश म्हात्रे ,नवनीत पाटील, कांतिलाल म्हात्रे,अल्पेश जोशी ,तेजस म्हात्रे यानी आपल कौशल्य पणाला लावले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.