Press "Enter" to skip to content

प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसची जोरदार निदर्शने

उत्तर प्रदेश मधील पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पनवेल जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह 🔶🔷🔶

सिटी बेल लाईव्ह । पनवेल । 🔷🔶🔷

उत्तर प्रदेशातील हातसर येथील दलीत समाजातील १९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचे अनन्वित हाल केले त्यामध्ये तिला प्राण गमवावा लागला व मृत्यू नंतरही तिची अवहेलना थांबली नाही. तिचे अंत्यसंस्कार करण्याचा हक्कही उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या कुटुंबाला दिला नाही.

अर्ध्या रात्री पोलिसांनी स्परस्पर अंत्यसंस्कार उरकले त्यामुळे सदर मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी व तिच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी ,अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंकाजी गांधी काँगेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना धक्का बुक्की करत राहुलजी व प्रियंकाजी याना अटक केली. या सर्व प्रकारामुळे निर्दयी, जुलमी भाजप सरकारच्या कारभाराविरुद्ध पनवेल जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने इंटक चे राष्ट्रीय सचिव, कामगार नेते महेंद्र घरत आणि कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पनवेल येथे सत्याग्रह करून निषेध करत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सदर मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी महेंद्रशेट घरत, सुदाम पाटील,निर्मला ताई म्हात्रे, हेमराज म्हात्रे, जनार्धन पाटील, शशिकला सिह ,एड. के एस पाटील, नोफिल सय्यद, शशिकांत बांदोडकर,सुधीर मोरे,विश्वजित पाटील,आरती ठाकूर, अभिजित मुदक्कल,हारपिंदर वीर,प्रकाश जाधव,जयंत देशमुख,प्रवीण कांबळे,अमित लोखंडे,विनीत कांडपीले,अरुण ठाकूर,रमेश राव,आदी मान्यवरांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप सरकारचा डाऊन फॉल सुरू झालेला आहे.यांची हिटलर शाही आता चालणार नाही. आज संपूर्ण देशात यांच्या विरोधात वातावरण पेटलेले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना आडवणे म्हणजे तानाशाही राजवट प्रस्थापित करण्याचा प्रकार आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या माजी अध्यक्षांना, तीन वेळा खासदार असलेल्या नेत्यांना जर उत्तर प्रदेश मधील योगी सरकार अशी वागणूक देत असेल, किंवा आमच्या प्रियांका गांधी यांच्यासारख्या महिला नेत्यांच्या वस्त्रांना हात घालण्याची हिंमत तिथल्या पोलिसांची आणि सरकारची होत असेल तर असली सरकारे टिकणार नाहीत.

महेंद्र घरत
इंटकचे राष्ट्रीय सचिव

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.