Press "Enter" to skip to content

आ. प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी

पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १००० बेडचे सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून द्या

सिटी बेल लाइव्ह /पनवेल (प्रतिनिधी) #

पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १००० बेडचे सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री महोदयांना निवेदनही दिले आहे. आ. ठाकूर यांनी केलेल्या मागणीत म्हंटले आहे कि, पनवेल, उरण तसेच नवी मुंबई मधील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोमार्फत निरनिराळ्या प्रकल्पासाठी अगदी तुटपुंज्या दरात संपादीत केलेल्या असून त्याबदल्यात सिडकोला प्रचंड फायदा झाला आहे. सद्यस्थितीत सिडकोचे पनवेल व उरण तालुक्यामध्ये मोठी गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत . ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली त्या दोन्ही तालुक्याच्या हद्दीतील कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा पुरवणे सिडकोचे प्रथम कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे मुलुंड येथे सिडकोने १२०० बेडचे कोविड रूग्णालय उभारले आहे. त्याच धर्तीवरती पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना रूग्णांसाठी किमान १००० बेडचे कोविड रूग्णालय तातडीने उभे करणे गरजेचे आहे. याखेरीज पनवेल व उरण तालुक्यातील मोठया क्षमतेच्या हॉस्पीटलांना आवश्यक ते वैद्यकिय साहित्य पुरविण्यास सिडकोने पुढाकार घेतल्यास अशा हॉस्पीटलबरोबर करार करून सिडको अथवा शासन नागरिकांना विनामुल्य अथवा कमीतकमी दरात कोरोना वर उपचारावर मदत मिळवून देवू शकते, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पनवेल, उरण तालुक्यातील तसेच रायगड जिल्हयातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पहाता सिडकोने तातडीने पावले न उचलल्यास या साप्तज्ञ वागणूकीच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण होवू शकतो. तरी सदर बाबतीत तातडीने पावले उचलावीत व पनवेल व उरण तालुक्यातील जनतेला सिडको मार्फत सदर सुविधा तातडीने निर्माण करून द्यावी, अशी महत्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत महितीस्तव रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनाही देण्यात आली आहे.

More from रायगडMore posts in रायगड »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.