सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔷🔶🔷
रायगड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरी धरणे आंदोलन साठी गेले असताना विधान सभेचे सर्व आठ आमदारानी मराठा समाजाच्या मागण्यांना लेखी स्वरुपात पाठिंबा दिला आहे.
विधानपरिषदेचे आमदार जयंत पाटील, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,उरणचे आमदार महेश बालदी,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,पेणचे आमदार रवि पाटील,अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कोकण शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद आमदार बाळाराम पाटील, कोकण स्थानिक स्वराज्य मतदार संघातील विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी मराठा समाजाच्या मागण्याना पाठिंब्यांचे पञ दिले. तसेच मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले आहे .
आजच्या धरणे आंदोलन मध्ये रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे , गणेश कडु , सुनील पाटील , रामदास शेवाले , अनिल भोसले , शशिकांत मोरे , अमित यादव , नरेश सावंत , उल्हास पवार , मंगेश दळवी , प्रदीप देशमुख , शंकर पवार ,अप्पा सत्वे तसेच इतर समन्वयक उपस्थित होते.
Be First to Comment