Press "Enter" to skip to content

जगाने घेतला सुटकेचा निःश्वास : कोरोना वर लस मिळाली

रशियाने मारली बाजी : कोरोना लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी !

सिटी बेल लाइव्ह / मॉस्को (रशिया) :

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना चा शेवट आता जवळ आला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण रशियाने कोरोना वर लस तयार करण्यात बाजी मारली असून या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

 कोरोना व्हायरसला आवर घालणारी लस कधी येणार याकडे जगभरातील सर्वांचे लक्ष्य लागून राहिले होते. जगभरातील अनेक देशांमध्ये यावर संशोधन सुरू आहे. मात्र आता लवकरच कोरोनाचा कायमचा बंदोबस्त होणार असून जागतिक महासत्ता अशी ओळख असणाऱ्या रशियाने कोरोनाची लस तयार केली आहे.

सेचेनोव फर्स्ट मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना यामध्ये यश आलं आहे. रशियन शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन मेडिसिन अॅण्ड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादिम तारासोव यांनी दिली. त्यामुळे ही जगातील पहिली कोरोना लस शोधून काढण्याचा मान आता रशियाला प्राप्त झाला आहे.

१८ जूनपासून रशियाच्या गमलेई इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीद्वारे तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर रविवारी सेचेनोव विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर प्रभावी अशी जगातील पहिली लस तयार केली आहे.सेचेनोव विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटॉलॉजी, ट्रॉपिकल अॅण्ड वेक्टर-बोर्न डिसिज विभागाचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासाच्या या टप्प्याचे उद्दिष्ट म्हणजे मानवी आरोग्यासाठी ही लस सुरक्षित ठरली आणि त्याची यशस्वी चाचणीही झाली. सध्या बाजारात असलेल्या लसींपेक्षा ही लस अधिक सुरक्षित असल्याचेही लुकाशेव यांनी रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकशी बोलताना सांगितले.

लसीच्या विकास आणि उत्पादनाबाबत निर्मात्यांनी धोरणे आधीच ठरविलेली आहेत. मात्र, ही जागतिक महामारी लक्षात घेता त्याचे उत्पादन तोकडे पडेल, असेही लुकाशेव यांनी यावेळी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.