Press "Enter" to skip to content

वाहन चालकांसाठी आज १ ऑक्टोबर पासून “हे”नवे नियम लागू

सिटी बेल लाइव्ह । मुंबई ।🔶🔷🔷🔶

आता वाहन चालवताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, सारखी कागदपत्र जवळ ठेवण्याची आवश्यकता असणार नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत एक अ‍ॅक्ट तयार करून नोटिफिकेशन जारी केले आहे, जो एक ऑक्टोबरपासून लागू होईल.
नव्या नियमांनुसार, आता फक्त कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोणतेही वाहन रस्त्यावर थांबवता येणार नाही.

१ ऑक्टोबरपासून हे बदल होणार

१ ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे.

परवाना रद्द करणे, ई-चलान नोंदणी यांसारखी सर्व कामे इलेक्‍ट्रॉनिक पोर्टलद्वारे केली जाणार आहे.

पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि ई चलानची माहिती वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होणार आहे.

डिजीटल कागदपत्रे सोबत ठेवण्यास चालकाला परवानगी असणार आहे.

यामुळे नियमांच्या पालनासह वाहनचालकांना होणारा त्रास थांबतील असा विश्वास मंत्रायलयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संकलन : अजय शिवकर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.