Press "Enter" to skip to content

भारतातील पालक झाले एकजुट

शिक्षा आंदोलनाच्या स्वरूपात स्वैछिक वर्चुअल भारत बन्द करुन सरकारला दिला इशारा 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे : अलिबाग 🔶🔶🔷🔷

“नैशनल एसोसिएशन फॉर पैरेंट्स एंड स्टूडेंट्स राइट्स” (NAPSR) द्वारे स्वैछिक वर्चुअल भारत बन्द पाळण्यात आला. ज्यामध्ये पालकांनी  स्वेच्छेने आपापले व्यावसायिक व व्यावहारीक काम बंद करुन, आपल्या मागण्या लिहीलेले पोस्टर हातामधे घेऊन फोटो काढून पीएमओ, मानव संसाधन मंत्री व आपापल्या राज्यातील सीएमओ आणि शिक्षणमंत्री यांना ट्वीट व मेल द्वारे पाठविले. 

भारताचे प्रधानमंत्री व सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन पाठवून इशारा दिला की, जर लवकरात लवकर पालकांच्या  व विद्यार्थ्यांच्या हितामधे सरकार काही चांगला निर्णायक फैसला नाही घेत. तर आज जे पालक वर्चुल भारत बन्द करीत आहेत, तेच उद्या रस्त्यावर उतरुन एक्चुल भारत बन्द करण्यासाठी मजबूर होतील. 

एसोसिएशन चे कोकण प्रदेश अध्यक्ष ” धनंजय म्हात्रे” यांच्या म्हणण्यानुसार कोरोना काळात संपूर्ण भारतातील लोकांची आर्थिक स्तिथि खराब झालेली आहे. हजारों लोक बेरोजगार झाले आहेत, लाखोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत. परंतु खाजगी शाळांची फीज भरण्यासाठी चा तगादा एवढा वाढला आहे कि ते फीज जमा न करणाऱ्या मुलांना फक्त ऑनलाइन क्लास मधून टर्मिनेट करुन थांबत नाहीत, तर मुलांना शाळेतून बेदखल करण्याची धमकी देत आहेत.

ज्यासाठी देशातील सर्व राज्यांमधील ठिकठिकाणच्या पालक संघांमार्फत शिक्षण विभाग आणि राज्य सरकारचे दरवाजे ठोठावून थांबले नाही, तर हायकोर्ट आणि सुप्रीमकोर्ट चा पण सहारा घ्यावा लागला. परंतु कुठल्याही राज्यातील पालकांना न्याय मिळाला नाही.

याविरोधात आता देशातील २८ राज्यातील पालक एकजुट झाले आहेत आणि सतत गूगल मीटच्या सहाय्याने चर्चा केल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला होता की  “शहीद भगत सिंहजी” यांच्या जयंतीला शिक्षण आंदोलनाच्या स्वरूपात साजरी करायची आणि स्वैछिक वर्चुअल भारत बंद करण्यात येईल, ज्यामध्ये आज सर्व राज्यातील पालकांनी ठीक ११:०० वाजता हैशटैग सोबत आपापल्या राज्यातून शिक्षणासाठी उठणाऱ्या मागण्या आणि भारत बंदला सोशल मीडियावर टाकून सरकारला पालकांच्या वेदना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

जेणेकरून भारत सरकार आणि राज्य सरकारांनी फक्त खाजगी शाळांचाच विचार न करता पालक आणि विद्यार्थ्यांचा पण विचार करावा. धनंजय म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार भारत बंद च्यावेळी ज्या प्रमुख मागण्या घेऊन प्रदर्शन करणार आहेत त्यातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे… 

(1) – हाफ स्कूल हाफ फीज  !

(2) – नो वैक्सीन नो स्कूल  !

(3) – फीज साठी चालणाऱ्या व्हाट्सएप ऑनलाईन क्लास बंद झाले पाहिजे.

(4) – शिक्षण नियामक आयोग लवकरात लवकर तयार करण्यात यावे..

(5) – फीज एक्ट लवकरात लवकर बनविण्यात यावा. 

(6) – फीज जमा न होण्याच्या कारणामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांला शिक्षणा पासून ठेवणाऱ्या शाळांच्या विरोधात RTE एक्ट नुसार FIR दाखल झाली पाहिजे.

(7) – सर्व विद्यालयांमधे NCERT सक्तीने लागू झाला पाहिजे.    

                                                      रायगड, ठाणे, मुंबई, पालघर येथून स्वैछिक वर्चुल बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यामधे  सर्व जिल्ह्यातील पालकांनी शिक्षण आंदोलन भारत बंदच्या समर्थनार्थ आपापले फोटो शेअर केले आहेत. 

यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष – धनंजय म्हात्रे, उपाध्यक्षा – सौ. अश्विनी कंटक, सरचिटणीस – सचिन पाटील, सचिव – प्रकाश नायक, खजिनदार – भरतकुमार जैन, अनिल कंटक, यशवंत हरेर ईत्यादी उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.