Press "Enter" to skip to content

“तो”व्हिडीओ बनविणे “टिकटाॅक” स्टार ला पडले महागात !

प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ तरूणीकडून सोशल मिडीयावर व्हायरल

खारघर पोलिसांकडून तपासाला सुरवात

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)

टिकटॉकवर सुप्रसिद्ध असलेल्या एका तरूणीने प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवताना बनवलेला आणि चुकून तिच्याकडून स्नॅपचॅटवर पोस्ट झालेला व्हिडीओ काही लोकांनी इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर अपलोड केल्याचा धक्कादायचक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे टिकटॉकवर लाखो चाहते असलेल्या या तरूणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान खारघर पोलिसांनी सदर तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल केला असला तरी त्या तरूणीने प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट असल्याची चर्चा सोशल मिडीयावर सध्या सुरू आहे.
या प्रकरणातील 22 वर्षीय टिकटॉक स्टार तरूणी खारघरमध्ये राहण्यास असून ती हिंदी, पंजाबी भाषेतील चित्रपटात अभिनय, गायिका आणि मॉडेलिंगचे काम करते. तसेच ती टिकटॉकवर व्हिडीओ करीत असल्यामुळे देशभरात व परदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे टिकटॉकवर तिचे लाखो चाहतेदेखील आहेत. या तरूणीने आपल्या प्रियकरासोबत स्वेच्छेने शारिरीक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ बनविला होता. त्यावेळी सदर व्हिडीओ चुकून तिच्याकडून स्नॅपचॅटवर पोस्ट झाला होता. याबाबतची माहिती तिला मैत्रिणीने तिला कळविल्यानंतर सदरचा व्हिडीओ 100 लोकांनी पाहून त्यातील 7 लोकांनी तो रेकॉर्ड केल्याचे तिला समजले. त्यानंतर तक्रारदार तरूणी सदरचा व्हिडीओ अकाऊंटमधून 2 तासात डिलीट केला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांमध्ये टिकटॉक स्टार तरूणीचा तो व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर व्हायरल झाल्याचे चाहत्यांकडून तिला समजले.

त्यानंतर सदर तरूणीने याबाबत अधिक माहिती घेतली असता तिचा व्हिडीओ वेगवेगळ्या लिंकवर व्हायरल होऊन त्यावर तिच्याबाबत घाणेरड्या व अपमानास्पद भाषेत टिका केल्याच्या कमेंट्स आढळून आल्या. तसेच शुभम श्रीवास्तव, आसिफ आणि शोएब खोसा यांनी सदर व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल करून आर्थिक फायदा घेण्यास सुरवात केल्याचे या तरूणीच्या लक्षात आले. या कालावधीत सदर तरूणीला काही व्यक्तींनी व्हॉट्सॅपवर व्हायरल करण्याची इन्स्टाग्रामवर धमकी दिल्याचे या तरूणीने खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सदर सर्व प्रकारानंतर सदर तरूणीने खारघर पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीवरून संबंधितांविरोधात आयटी एक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली आहे. मात्र टिकटॉकवर तिचे लाखो चाहते असलेल्या या तरूणीचा तिच्या प्रियकरासोबतचा असलेल्या व्हिडीयोने सोशल मिडीयावर सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे. परिणामी सदर तरूणी सोशल मिडीयावर अधिक प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे त्या तरूणीने प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट असल्याची चर्चा सोशल मिडीयावर सध्या सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.