Press "Enter" to skip to content

ऑनलाईन शिक्षण देणे काही खायचे काम नाही

शाळेची फी न भरणाऱ्या पालकांनो जरा ही बातमी पहा आणि वाचाच

सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट :🔷🔶🔶🔷

सध्या ऑनलाईन शिक्षणाने मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी उचलली आहे. कोरोना महामारी मधील covid 19 विषाणूचे थैमान पाहता किमान पुढचे तीन महिने तरी शाळा सुरू होईल असे वाटत नाही.असे असले तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून तमाम शिक्षकवृंद अध्ययन करण्याचे काम इमानेइतबारे करत आहेत.

ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळत असले तरीसुद्धा या घडीला शिक्षण संस्था चालकांचे मात्र धाबे दणाणले आहेत. मागच्या शैक्षणिक वर्षातील अंतिम परीक्षा न होऊ शकल्याने त्या वर्षातील कित्येक विद्यार्थ्यांचे शुल्क अद्यापही बाकी आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन चार महिने लोटले तरीसुद्धा ही भरण्याच्या बाबत शासनाचे खंबीर धोरण नसल्याने कित्येक पालक अद्यापही पाहू,बघू अशी भूमिका घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर आम्ही शामल मोहन पाटील शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश हायस्कूल,कळंबोली येथील शिक्षक राबवत असलेल्या उत्कृष्ठ पॅटर्न चा आढावा घेतला.यावेळी संस्थापक अध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले की,सामाजिक अंतर रखण्याबाबत चे सारे निकष पाळून आमचे शिक्षक ऑनलाईन शिक्षण देत आहेत.पारदर्शक प्लास्टिक पडदे,निर्जंतुक द्रव्याचा वापर यांच्या मुळे वातावरण जांतुविरहित ठेवण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असतो.

ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक बांधव देखील त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत.कित्येक शिक्षकांना स्वतःच्या घरून ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबविता येत नसल्याने त्यांना शाळेत यावे लागते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.