Press "Enter" to skip to content

नव्या कृषी विधेयकांतून शेती नष्ट करण्याचा डाव


शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा कडाडून विरोध :
शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध करण्याचे आवाहन 🔶🔷🔷🔶

आ.जयंत पाटील, सरचिटणीस शेकाप

सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔶🔶🔷🔷

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर रविवारी संसदेच्या अधिवेशनात तीन कृषी विधेयके मंजूर केली. ही विधेयके चुकीची असून सर्वांनी एकत्र येऊन विरोध करायला हवा. हमी भाव, शेतमाल खरेदी या विषयावर चर्चा न करता कृषी विधेयकांचे स्पष्टीकरण न देता विधेयके मंजूर करण्यात आली. देशातील सर्व शेतकरी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांनी या विधेयकाला तीव्र विरोध करायला हवे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

केंद्र सरकारने मंजुर केलेल्या तीन कृषी विधेयकांवर शेतकरी कामगार पक्षाची भुमीका व्यक्त करताना आ. जयंत पाटील बोलत होते. शेतकर्‍यांना वार्‍यावर आणि संपूर्णपणे शेती उद्योग नष्ट करण्याची भुमीका केंद्र सरकारचे सांप्रतचे राज्यकर्ते घेत आहेत. त्या दृष्टीकोनातून खर्‍या अर्थाने कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा विरोध व्हायला हवा होता तो होत नाही. पण याचे गंभीर परिणाम भविष्यात शेती व्यवसायावर होणार असल्याचे मत आ. जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. शेती उद्योग हा संपूर्णपणे नष्ट होईल अशी भीतीही यावेळी त्यांनी व्यक्त केली. आधारभुत किंमत आणि हमीभावाची मागणी या देशामध्ये पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाने केली.

दाभाडी प्रबंधाच्या माध्यमातून आम्ही प्रामुख्याने ही मागणी केली होती. आज अनेक लढे देऊन हमी भावाची मागणी इथल्या पुरोगामी विचारांच्या आणि शेतकर्‍यांच्या चळवळीमुळे खर्‍या अर्थाने आपल्याला प्रस्थापित झाली होती. तो कायदाच संपूर्णपणे नष्ट करण्याचे काम सांप्रतचे केंद्र सरकार करत असल्याचा आरोप यावेळी जयंत पाटील यांनी केला. या केंद्र सरकारच्या धोरणामुळे संपूर्ण

शेती व्यवसाय ठरण्याचा दृष्टीकोन केेंद्र सरकारचा दिसतोय. विशेषतः शेतकर्‍यांचा उत्पादित केलेला माल ज्या बाजार समित्यांमध्ये येत होता, त्या बाजारसमित्यांचे अस्तित्वच नष्ट करण्याचा डाव या विधेयकामध्ये आणलेला दिसतोय. या संपूर्ण उद्योगामध्ये बडया व्यापारी आणि कार्पोरेट कंपन्या येऊन त्यांच्या यामध्ये लिंक तयार करुन शेतीच्या उत्पादित मालाची कमी किमतीमध्ये खरेदी करण्याचा दृष्टीकोन आणि धोरण यामध्ये दिसत आहे. म्हणून या सर्व बाबतीमध्ये शेतकर्‍यांच्या बाजूने लढत आलेले जे विविध पक्ष, विविध शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन याला तीव्र विरोध करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कोरोनामुळे लोकांना चळवळ उभी करता येणार नाही लोकं रस्त्यावर येऊ शकत नाहीत निषेध व्यक्त करु शकत नाहीत. याच्यामध्ये लबाडीचा डाव दिसतो आहे. कोरोनामुळे लोकांना विरोध प्रकट करता येणार नाही. ही संधी साधूनच घाई घाईत विधेयक मंजूर केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा प्रकार चुकीचा आहे, त्या दृष्टीकोनातून सर्वांनी एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे. या देशातला राज्यातला शेतकरी खर्‍या अर्थाने जगला पाहिजे. ज्यांनी अनेक वर्ष घामातून हा उद्योग उभा केलेला आहे. हा व्यवसाय शेतकर्‍याने खर्‍या अर्थाने नवीन आधुनिक तंत्रज्ञान घेऊन उभा राहत असताना. उत्पादित हमी भाव ठरवला गेलेला आहे. त्याची खरेदीची यंत्रणा देखील केंद्र सरकार खर्‍या अर्थाने योग्य त्या पद्धीतने करीत नसल्याचा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला.

आधारभुत किंमतीची जी केंद्र आहेत नाफेड असो कि बाजारसमिती असो या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात त्याला पण मुद्दाम कालावधी ठरवला जातो. शेतकर्‍यांचा माल व्यापार्‍यांच्या ताब्यात गेल्यानंतर खरेदी केंद्र उघडली जातात त्याच्यावर कसलीही चर्चा न करता केंद्र सरकारच्या नवीन घोषणेप्रमाणे आम्ही आधारभुत किंमत ठेवणार म्हणून सांगितले असतानाही हे विधेयक कशासाठी आणले गेले? या विधेयकाला अर्थ काय राहणार आहे याचे स्पष्टीकरण दिले गेले पाहिजे होते. या विधेयकाला एकत्र येऊन तीव्र विरोध केला पाहिजे असे आवाहन तमाम शेतकरी चळवळीतील नेत्यांना भाई जयंत पाटील यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.