Press "Enter" to skip to content

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची यशस्वी मध्यस्थी

ह्युंडाई मुबीस कंपनीतील ११० भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे आश्वासन 🔶🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔷🔶🔶

रसायनी एमआयडीसी चावणे विभागातील हुंडाई मोटर कंपनीचे मोबीस इंडिया स्पेअर पार्ट्सच्या गोडावूनमध्ये गेल्या सहा वर्षापासुन १२२ कामगार काम करित आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी १२२ कामगारांपैकी फक्त ५४ कामगार कंपनीत काम करतील अशी कंपनीच्या गेटवर नोटिस लावल्याने सर्व कामगार एकत्र येवुन जोपर्यंत १२२ कामगारांना कामावर घेत नाही तो पर्यंत कंपनी चालु न करण्याचा निर्णय घेतला होता. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यशस्वी मध्यस्थी करून हा प्रश्न मार्गी लावल्याने कामगार वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय देण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, आमदार महेंद्र थोरवे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात तातडीने भेट घेवुन या कामगारांना न्याय देण्याबाबत विनंती केली. उद्योगमंत्री यांनी ताबडतोब दिनांक १५ सप्टेंबर रोजी संबंधीत विभागाचे अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली.
सदर बैठकीमध्ये ह्युडाई मोबीज इंडिया या कंपनीने सर्व कामगार कामावर घेण्यात यावे तसेच कोणत्याही कामगाराची नोकरी जाऊ नये अशा सूचना कंपनी व्यवस्थापनाला केल्या होत्या. कंपनी व्यवस्थापनाला पुढील २ दिवसात निर्णय देण्याचा घेण्याचा अवधी दिलेला होता.

याबाबत आज सोमवार 21 सप्टेंबर रोजी उद्योगमंत्री यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधितांची बैठक घेतली असता. कंपनी व्यवस्थापनाने यावर सविस्तर विचार करुन ११० भुमीपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे कामगार वर्गातून नामदार सुभाष देसाई, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे आभार मानले जात आहे.

सदर बैठकीसाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर शेठभोईर, जिल्हापरिषद सद्स्य मोतिराम ठोंबरे, युनियन प्रतिनिधी रोहित विचारे कंपनी एम.डी श्री.मुरलीधरन, महेश सोनवणे, शिवसेना कामगार नेते महादेव घरत, मनोहर देशमुख उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.