Press "Enter" to skip to content

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा केला प्रयत्न ! 🔷🔶🔷🔶

आम्ही डाव वेळीच हाणून पाडला – गृहमंत्री अनिल देशमुख 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह / मुंबई : 💠🌟💠🌟

महाराष्ट्राच्या राजकारणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची केलेल्या एका गौप्यस्फोटाने मोठी खळबळ उडवून दिली. काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी धक्कादायक माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

एका दैनिकाच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले.

सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ते नेमके काय प्रकरण आहे ? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत ? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.

कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमिताभ गुप्ता या पोलीस अधिकाऱ्यांने येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी संमतीपत्र दिले. त्यामुळे सरकार अडचणीत आले. त्यांना आता पुण्याचे आयुक्त केले आहे. याचे समर्थन कसे कराल, असे विचारले असता गृहमंत्री म्हणाले, गुप्ता यांच्या हातून त्या काळात शंभर टक्के चूक झाली. ती मोठी चूक होती. त्यांनी चौकशी समितीसमोर जाहीर कबुली देखील दिली. पण त्यांची आजपर्यंतची कारकिर्द चांगली राहिली आहे. म्हणूनच त्यांना आता पुण्याची जबाबदारी देण्यात दिली.
छोट्या – छोट्या कारणांसाठी राज्यपालांकडे जाण्याचे काम विरोधी पक्षाकडून होत आहे. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. पण त्यांनी आता राजभवनावर एक रूम घेऊन राहावे. म्हणजे जाण्या-येण्याचा त्रास होणार नाही, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले.

कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्याविषयी ते म्हणाले, मुंबईला पाकिस्तान म्हणायचे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणून संबोधायचे, अशा गोष्टी करणाऱ्यांची मी नावही घेऊ इच्छित नाही. या सगळ्या गोष्टींना भाजप खतपाणी घालत आहे असा आरोप त्यांनी केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.