Press "Enter" to skip to content

मराठा क्रांती मोर्चा : महाराष्ट्रात २० ते २५ ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू

सिटी बेल लाइव्ह / मुंबई : 🔷🔶🔷🔶

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्र भरातून मराठा बांधव विविध आंदोलन करून सामाजिक दबाव वाढवत आरक्षणाच्या लढा देत आहेत. मराठा क्रांती मोर्चा,मुंबई ने ठरवल्या प्रमाणे मुंबई मध्ये जवळपास २० ते २५ ठिकाणी आज दि.२० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी ०१ वा दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे. सदर आंदोलन मराठा बांधव सर्व नियमांचे पालन करीत करोना बाबतची दक्षता (तोंडाला मास्क,सोशल डिस्टन्सिंग,सॅनिटायजर ) घेत आपला निषेध नोंदवणार आहेत.मुंबई लगतच्या शहरांमध्ये देखील एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.तरी सर्व मराठा बांधवांनी आपापल्या विभागातील ठरलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला हजेरी लावून आपल्या पुढच्या पिढ्यांकरिताच्या या लढ्यात महत्वपूर्ण योगदान द्यावे असे मराठा क्रांती मोर्चा,महामुंबई तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील ठिय्या आंदोलनाची ठिकाणे


१ प्लाझा सिनेमा,दादर (प)
२ भारतमाता टॉकीज,लालबाग
३ शिवाजीराजे पुतळा,पांजरपोळ,चेंबूर
४ वरळी नाका,वरळी
५ गिरगाव चर्च,गिरगाव
६ कला नगर जंक्शन, बांद्रा (पु)
७ शिवस्मारक,विमानतळ,पश्चिम दृतगती
मार्ग,विलेपार्ले(पु)
८ जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पु)
९ शाम नगर तलाव जोगेश्वरी(पु)
१० दहिसर रेल्वे स्थानक(पु/प)
११ शिवाजी चौक,बरकत नाका,वडाळा(पु)
१२ संगमेश्वर मंदिर,कुर्ला (प)
१३ साईबाबा मंदिर,मानखुर्द (प)
१४ मराठी विद्यालय,पंतनगर,घाटकोपर(पु)
१५ गणेश मंदिर,भटवाडी,घाटकोपर(प)
१६ शिवाजी महाराज पुतळा,कन्नमवार
नगर-२,विक्रोळी(पु)
१७ आयआयटी गेट समोर,पवई
१८ शिवाजी तलाव,भांडुप (प)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.