Press "Enter" to skip to content

प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवर मंञालयात सकारात्मक चर्चा

बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उरण पनवेल महाविकास आघाडीची बैठक 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / मुंबई (घन:श्याम कडू) 🔶🔶🔷🔷

पनवेल उरणमधील विविध समस्यांबाबत बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण पनवेल महाविकास आघाडीची आज बैठक संपन्न झाली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश अधिकारी वर्गांना दिले आहेत.

उरण पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना संबंधितांची उरण पनवेल परिसरातील नागरी समस्यांबाबत बैठक बोलविण्यास सांगितले होते. त्यानुसार उरण पनवेल महाविकास आघाडीची आज मंत्रालयात नामदार एकनाथ शिंदे यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत सिडको प्रकल्पग्रस्तानी नैसर्गिक गरजेपोटी पोटी बांधलेली घरे आपल्या माध्यमांतून नियमित व्हावीत, पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील कामे स्थानिकांच्या अडचणी लक्षात घेता त्यांच्या शंकांचे निरसन झाल्या खेरीज आपण पंतप्रधान आवास योजनेस मान्यता देऊ नये व सदरील भूखंडावर असलेला विरोध पहाता आपण सदर भूखंडाच्या विकासाबाबत फेरविचार करावा, उरण येथील १०० खाटांचे व पनवेल परिसरातील नागरिकांसाठी सिडको व जेएनपीटी कडून अद्यावत रुग्णालयाची उभारणी लवकरात लवकर करण्यात यावी, सद्या उरण पनवेल येथे कोरोना या महामारीचे वाढते रुग्ण पहाता येथे आसीयु तसेच कोविड सेंटर बाबत चर्चा करण्यात आली.

तसेच उरण व खारघर येथे कोविड साठी १०० बेडचे कोविड सेंटर त्वरित उभारावे असे मंत्री महोदयानी आदेश सिडकोला दिले असता उद्या या सेंटरच्या जागेची पाहाणी करण्यासाठी सिडको जॉइंट एमडी शिंदे हे करणार आहेत, नैना प्रकल्पा बाबत सविस्तर विचार मंथन करण्याबाबत प्रकल्पग्रस्तांबरोबर सिडको एमडी यांनी बैठक लवकरात लवकर घ्यावी आणि एमडी यांनी प्रकल्पग्रस्तांचे नुकसान होणार नाही हे पहावे, पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक विचार विनिमय करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

या बैठकीला पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील,
जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरण पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, निलेश पाटील, कार्याध्यक्ष पनवेल काँग्रेस सुदाम पाटील, उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार तसेच सिडको एमडी मुखर्जी व जेएनपीटी प्रतिनिधी डॉ. सुदाम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.