Press "Enter" to skip to content

मनाला चटका लावणारी बातमी : हरहुन्नरी कलाकार प्रशांत लोंखंडेंची एक्झीट

स्वराज्य रक्षक संभाजी मालीकेमध्ये आब्दुल्ला दळवी या सिद्दीच्या सरदाराची दमदार भूमीका गाजवलेले कलाकार 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह / उरण ( सुभाष कडू) 🔷🔶🔷🔶

मराठी मालीका क्षेत्रातील उत्कृष्ठ कलाकार प्रशांत लोखंडे यांचे दि.14 रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.प्रशांत लोखंडे हे स्वराज्य रक्षक संभाजी मालीके मध्ये आब्दुल्ला दळवी या सिद्दीच्या सरदाराची दमदार भूमीका केल्याने संपूर्ण घराघरात पोहचले होते.

या मालीकेतील “बादमे कटकट नको” हे त्यांचे वाक्य लहान थोरांच्या ओठी सहजच येत होते.

त्याच बरोबर मोलकरीण बाई या मालिकेमध्ये ही त्यांनी काम केले होते. सतत हासत मूख स्वभावाचे असणारे प्रशांत यांनी सध्या सोनी टिव्ही वर चालू आसलेल्या स्वराज्यजननी जिजामाता मालीकेमध्ये बाजी घोरपडे यांचीही भूमिका तेवढ्याच तोलात साकारली होती.

त्यांच्या मृत्यूमूळे स्वराज्यरक्षक संभाजी व स्वराज्यजननी जिजामाताच्या टिमने श्रद्धांजली वाहीली.तर महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांनी समाजमाध्यमांवर शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहीली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.