Press "Enter" to skip to content

शेकापच्या मागणीला यश, शेतकऱ्यांच्या मुग,उडीद खरेदीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू


शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन प्रक्रिया करून घ्यावी – भाई गुंड

सिटी बेल लाइव्ह / बीड :(प्रतिनिधी) 🔶🔷🔷🔶

हंगाम 2020-2021 मधील किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत हमी भावाने आज दि. 15 सप्टेंबर पासून मूग,उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु केल्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले खरे तर या वर्षी शेतकऱ्याचा मुग, उडीद,सोयाबीन, ऊस आदि पिकाचे गेल्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्याच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेली असून त्यातून शेतकरी आद्याप सावरला नाही परंतु त्यातूनही शिल्लक असलेले पीक शेतकर्‍याच्या पदरात पडलेले असून त्याच्या विक्रीसाठी शेतकरी व्यापाराच्या उंबरठे झिजवताना दिसत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली भाई ॲड संग्राम तुपे, भाई अॅड.नारायण गोले पाटील, भाई दत्ता प्रभाळे, भाई भिमराव कुटे, भाई अशोक रोडे,भाई प्रवीण खोडसे भाई माऊली जाधव, भाई सुर्यकर्ण येवले,भाई सौरव संगेवार, भाई शेख वजीर,भाई व्यंकट खुळे, भाई शिवाजी जगताप,भाई राक्षे आदी नेत्यांनी जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय यांना मूग उडीद खरेदी शासनाने तात्काळ सुरू करावी यामागणीसाठी निवेदने देऊन आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, शासनाने आणि प्रशासनाने शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाचा धसका घेऊन शासनाने खरेदीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे आभार मानत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.