Press "Enter" to skip to content

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मागणीला यश


संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट 🔶🔷🔶🔷


माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचे २०१७ सालचे विधायक मंजूर 🔷🔶🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷

माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या करातून यापुढे सूट मिळणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीतून आता हि सवलत सैनिकांना मिळणार आहे.

शिवसेनेचे उरण विधानसभेचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शासनाकडे सदर मागणी केली होती. तसेच विधानसभेतही आवाज उठविला होता.
माजीआमदार मनोहरशेठ भोईर यांनी विधानसभेत अनेकवेळा लक्षवेधी मांडून उरणसह कोकण आणि राज्यांतील अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यांच्या सातत्याने विधानसभेत लक्षवेधी असल्याने त्यांना लक्षवेधी आमदार म्हणूनही बोलले जायचे.

आमदारकीच्या कार्यकाळात सैनिकांसाठी त्यांनी मांडलेल्या विधेयकाला त्यावेळच्या सरकारने मंजुरी दिली नव्हती, परंतु आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारने सदर विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ मंजुरी दिली आहे. आता यापुढे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रॉपर्टी टॅक्समधून माजी सैनिक, संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, आणि माजी सैनिकांच्या विधवांना सुट मिळणार आहे. सैनिकांना न्याय दिल्याने माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे आभार मानण्यात येत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.