Press "Enter" to skip to content

मुंबई गोवा महामार्गावर अवतरला चक्क यमदुत…!

महामार्गाच्या दुरावस्तेकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन 🔷🔶🔶🔷

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही महामार्ग दुरावस्थेकडे वेधले होते लक्ष ! 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्तेकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.14) मनसेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई गोवा महामार्गावर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड यांच्या कार्यालयावर यमदुताला पाचारण करून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंत्यांचे मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम, ठिकठिकाणी रस्त्याला पडलेले खड्डे, दिशादर्शक फलकाची दुरवस्था, महामार्गावर उन्हात होणारे धुळीचे साम्राज्य, निकृष्ट दर्जाचे उड्डाणपुल या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. तसेच अपघात व जीवित हानी या विषयी जाब विचारण्यात आला व निवेदन देण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत हेगडे व अधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू वर्षी डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिली व तसे लेखी आश्वासन मनसेला देण्यात येईल अशी खात्री दिली.

या आंदोलनात मनसेचे संदिप ठाकुर यांच्यासोबत पनवेल महानगरपालिका कर्मचारी सेना अध्यक्ष यतिन देशमुख,पेण तालुका सचिव नागेश गावंड, पेण तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रविण म्हात्रे, पेण शहराध्यक्ष नितीन पाटील, डोलवी विभागाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, डोलवी शाखाध्यक्ष समीर पाटील, दुरशेत शाखाध्यक्ष जयेंद्र डंगर, ज्ञानेश्वर ठाकुर, गणराज साळवी,कल्पेश म्हात्रे तसेच समस्त महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.