Press "Enter" to skip to content

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी वेधले लक्ष 

महामार्गाचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्या : नितीन सरदेसाई यांची मागणी 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशातच सध्या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या महामार्गाने आजवर कित्येक निष्पाप जीवांचे बळी घेतले आहेत. 

महामार्गाच्या  दुरावस्थेबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यथा मांडली आहे. महामार्गावर  सुरू असलेल्या रुंदीकरण कामाबाबत आणि पडलेल्या खड्याबाबत त्यांनी व्हिडीओ केला आहे. गेली अनेक वर्षे महामार्गाचे सुरू आहे. गणेशोत्सव उत्सवा वेळी खड्डेमय रस्त्याने चाकरमानी गेले. आतातरी सरकारने मुंबई गोवा महामार्गाकडे लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी कळकळीची विनंती नितीन सरदेसाई यांनी व्हिडिओद्वारे शासनाकडे केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल, पेण, नागोठणे, माणगाव येथील  जीवघेण्या परिस्थितीचा प्रवाशी , रुग्णांना मोठा फटका बसतोय. मोटारसायकल स्वार यांची तर परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांचा प्रवास अक्षरश. मृत्यूच्या जबड्यातून होतोय.

मनसे नेते नितीन सरदेसाई हे  रत्नागिरी येथून मुंबईकडे निघाले होते. मुंबई गोवा महमार्गाची झालेली खड्डेमय परिस्थिती पाहून माणगावनजीक सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी थांबून व्हिडीओ केला. रातमगिरी पासून ते माणगाव पर्यत महामार्ग हा खड्डेमय झाला आहे. प्रवास करताना खड्यामुळे दोन अपघात झालेले पाहिले. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गावर सुरू असलेल्या कामाठिकाणी कोणीही नसल्याचेही सरदेसाई यांनी व्हिडिओद्वारे दाखविले आहे.

गणेशोत्सव पूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करणार होते. मात्र चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्यानेच जावे लागले. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम रडतखडत सुरू आहे. आतातरी सरकारने हा महामार्ग सुस्थितीत करावा अशी कळकळीची विनंती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.