सिटी बेल लाइव्ह / मुंबई शेअर 🔶🔷🔶🔷
मराठा क्रांती मोर्चा तर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेण्यात आली. परवा आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा नंतर मराठा समाजामध्ये असलेल्या आक्रोशाची कल्पना राज्यपालांना देण्यात आली.
त्यासोबत मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात सुद्धा माननीय राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली. मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल व यासंदर्भात राज्य सरकारला योग्य त्या सूचना देईल असे आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिले. त्याचसोबत मराठा तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे प्रकारचे आवाहन सुद्धा त्यांनी मराठा समाजाला केलेले आहे.
सदर बैठकीत मराठा क्रांती मोर्चा तर्फे विनोद साबळे, प्रशांत सावंत, अॅड अभिजीत पाटील, राजन परब, शंकर पार्सेकर व किरण सावंत हे उपस्थित होते.
Be First to Comment