Press "Enter" to skip to content

सोनू सूद देणार गरजू मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप : असा करा अप्लाय

सिटी बेल लाइव्ह / मुंबई : 🔷🔶🔷🔶

प्रवासी मजुरांसाठी रोजगार ॲप आणि या ॲपच्या माध्यमातून त्यांना घराची ऑफर दिल्यानंतर आता सोनू सूदने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरू केली आहे.

कोरोनाच्या या परिस्थितीत सोनू सूदने तशी अनेक गरजू मुलांना शिक्षणात मदत केल्याचं आपण आता पाहिलं आहे आणि आता त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गरीब आणि गरजू मुलं, ज्यांना पैशांअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. सोनूने अशा मुलांसाठी स्कॉलरशिप सुरू केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.सोनूने याबाबत ट्वीट केलं आहे.

“जेव्हा सर्व शिकतील, तेव्हाच हिंदुस्तान पुढे जाईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फुल स्कॉलरशिप लाँच करत आहे. आर्थिक आव्हानं कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोखू शकत नाहीत असा विश्वास मला आहे. पुढील दहा दिवसांत तुम्ही

scholarships@sonusood.me

यावर एंट्री करा आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचेन”, असं ट्वीट सोनूने केलं आहे.

सोनू म्हणाला, “आपलं भविष्य आपली क्षमता आणि मेहनत ठरवेल. आपण कुठून आलो आहोत, आपली आर्थिक स्थिती काय आहे याचा काहीही संबंध नाही. हा माझा एक प्रयत्न आहे. शाळा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप. जेणेकरून तुम्ही पुढे जाल आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्याल.

scholarships@sonusood.me

यावर ई-मेल करा”

या पोस्टरमध्ये मॅनेजमेंट, वैद्यकीय, कायदे आणि शेतीविषयक अशा सर्व कोर्सेचा समावेश असल्याचं दिसतं आहे. ज्या कुणाला आपलं शाळेनंतरचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, त्यांच्यासाठी आता आर्थिक अडचण राहणार नाही. कारण त्यांना सोनू सूदने मदतीचा हात दिला आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.