Press "Enter" to skip to content

सोन्या चांदीचे भाव घसरले जाणून घ्या आजचे बाजार भाव

सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🔶🔷🔶🔷

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील घसरण सुरूच आहे. सध्या सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅम ५२ हजारांच्या खाली आला आहे. चांदीमध्येमध्ये घसरण सुरूच आहे.

सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण पहायला मिळाली. आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणाने कमॉडिटी बाजारात नफावसुलीचे सत्र सुरू आहे. यामुळे आज सोने ३०१ रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याचा भाव ५१७१५ रुपये प्रती दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात ४०१ रुपयांची घसरण झाली असून चांदीचा भाव एक किलोला ६६६६६ रुपये झाला आहे.

आज बाजार उघडताच सोने पुन्हा दबावात आले. सोन्यामध्ये विक्री सुरु झाली. सध्या सोन्याचा भाव ५१६३० रुपयांपर्यंत घसरला होता. सध्या सोने ३०१ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ५१७१५ रुपये झाला आहे.

मागील आठवड्यात सोने १५०० रुपयांनी कमी झाले होते. तर चांदीचा भाव १६५० रुपयांनी कमी झाला होता. यापूर्वी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५६१९१ रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकावर गेला होता. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १९४७ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव प्रती औंस २६ डॉलर आहे.

सोने महागणार की स्वस्त होणार; काय सांगतात कमॉडिटी विश्लेषक
२०१९-२० या आर्थिक वर्षात देशात १३.१६ अब्ज डॉलर म्हणजे ९१४४० कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले होते. मात्र यंदा करोना आणि महागाईचा फटका या मौल्यवान धातूंच्या आयातीला बसला. सोने आयातीत एप्रिल ते जुलै या दरम्यान मोठी घसरण झाली. या काळात २.४७ अब्ज डॉलर इतके (भारतीय चलनात १८५९० कोटी) सोने आयात करण्यात आले. त्यात गत वर्षाच्या तुलनेत ८१.२२ टक्के घसरण झाली. दरम्यान सोने आयात कमी झाल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला असून चालू खात्यातील तूट मर्यादित ठेवणे सरकारला शक्य होणार आहे.

अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर ०.२ टक्क्यांनी कमी झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला. युरोझोनमधील रखडलेली वसुली व अमेरिकी धोरणकर्त्यांची चिंता वाढत असूनही सलग दोन आठवडे तोटा होऊनही सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

आयकर रिफंड तत्पर; चोवीस लाख करदात्यांना झाला फायदा
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने २८ आणि २९ जुलै २०२० रोजी झालेल्या धोरणात्मक बैठकीत सुधारणेसाठी खडतर मार्ग सुचवला होता. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून आणखी प्रोत्साहनपर आधाराची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे सोन्याच्या किंमतीतील घसरण मर्यादित राहिली. तसेच १५ ऑगस्ट २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेत १० लाखांहून अधिक बेरोजगारीचे दावे दाखल झाल्यानेही सोन्याच्या किंमतींना काहीसा आधार मिळाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.